Virat Kohli

मंद खेळपट्ट्यांवर चाचपड़तो कोहली

विराटला का खेळवू नये, याचे ठोस कारण देताना निवडकर्ते म्हणतात, ‘वेस्ट इंडीजमधील खेळपट्ट्या मंद आहेत आणि विराट अशा खेळपट्ट्यांवर चाचपडतो. त्यामुळे त्याला विश्वचषकापासून दूर ठेवले जाईल. विराटने वेस्ट इंडीजमध्ये ३ टी-२० सामने खेळले, त्या त्यात ३७.३३च्या सरासरीने ११२ धावा केल्या. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. कोहलीने विडीजमध्ये १९ वनडेत चार शतकांसह ८२५ धावा काढल्या आहेत.

युवा खेळाडूंना संधी

टी-२० विश्वचषकात सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्यासारख्या स्टार खेळाडूंना संधी मिळावी, असे निवड समितीला वाटते. हे सर्व जण टी-२०त उपयुक्त मानले जातात. विराटच्या खेळविण्याचा निर्णय बोर्डाला नव्हे, तर राष्ट्रीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल.