दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हा मान्सून पूर्व पाऊस असेल तर पुढील एक ते दोन दिवसांत मान्सून मुंबईत धडकणार असून त्यानंतर मान्सूनच्या सरी कोसळतील.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तर हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यात आहे.
या काळात नुसता पाऊसच पडणार नसून महाराष्ट्रात वादळाचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात राज्यात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका राहणार आहे.
आज राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून, नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पुढील 48 तासांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.