परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

जिल्हा परिषद आरोग्य सेवक व ग्रामसेवक पदांच्या भरतीसाठी अर्ज भरून चार महिने झाले आहेत. मात्र, परीक्षेच्या तारखा जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली. यानंतर आता परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून १३ जूनपासून विविध परीक्षा सुरू होणार आहेत.

परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत होते. ही परीक्षा लवकर घ्यावी. मात्र, उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल अशा पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाकडे केली होती. यातच आता परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.